चिं. मो. पंडित - लेख सूची

संपादकीय

आजचा सुधारक चा पाण्यावरचा हा विशेषांक वाचकांपुढे ठेवताना मी जरा बेचैन झालो आहे. पाणी हा विषय इतका मोठा आणि आपल्या जिव्हाळ्याचा आहे की एकट्यादुकट्या माणसाने त्याला न्याय देणे अवघड आहे. तरीदेखील हे धारिष्ट्य आसु वरील प्रेमापोटी आणि वाचकांच्या उदारपणावर विश्वास ठेवून करत आहे. पाणी हा पदार्थ मोठा विचित्र आहे. घन, द्रव आणि वायुरूप (बर्फ, पाणी, …

पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू

1) विषयप्रवेश पाऊस आकाशातून पडतो. केव्हाही, कुठेही, कितीही पडतो. लोकांना वाटते पावसाचे पाणी फुकट मिळते. पाऊस आपल्या अंगणात आणि शिवारातच फक्त पडत नाही. रानावनात, डोंगरदऱ्यांत… सर्वत्र पडतो. हे पाणी धरून ठेवावे लागते. वाहून न्यावे लागते. आयात-निर्यात करावे लागते, स्वच्छ ठेवावे लागते, पुढील पाऊसकाळ येईपर्यंत पुरवावे लागते. म्हणून पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी लागणारे व्यवस्थापक, अभियंते, …

जमिनीचे धूप-नियंत्रण आणि माती-संवर्धन, व्यवस्थापन

गेल्या काही वर्षांत दीड पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना अनुदानाचा दिलासा देऊनही त्यात काही फरक पडल्याचे जाणवत नाही. दुसरीकडे शेतीचे एकरी उत्पादन घटतच आहे. इतर काही पर्याय मिळाल्यास जवळपास ४०% शेतकरी शेती व्यवसाय सोडून देण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा की कुठेतरी मूलभूत काहीतरी बिनसले आहे. ते शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न. कोठच्याही उत्पादक उपक्रमाची …

जमिनीचे धूप-नियंत्रण आणि माती-संवर्धन, व्यवस्थापन

गेल्या काही वर्षांत दीड पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना अनुदानाचा दिलासा देऊनही त्यात काही फरक पडल्याचे जाणवत नाही. दुसरीकडे शेतीचे एकरी उत्पादन घटतच आहे. इतर काही पर्याय मिळाल्यास जवळपास ४०% शेतकरी शेती व्यवसाय सोडून देण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा की कुठेतरी मूलभूत काहीतरी बिनसले आहे. ते शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न. कोठच्याही उत्पादक उपक्रमाची …

अमेरिकन शेती आणि भारत

तसे पाहिले तर अमेरिका (यूएसए) हा कोणाचेही कुतूहल चाळवणाराच देश आहे. अवघ्या ४५०-५०० वर्षांत शून्यातून उभे राहून हा देश आज सर्व जगात बलाढ्य देश झाला आहे. साहजिकच प्रत्येक गोष्ट अमेरिकेत कशी होते हे जाणून घेण्याकडे आपला कल असतो. पण तत्पूर्वी काही गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक आहे. अमेरिकेचे क्षेत्रफळ ९३.८ लक्ष चौ. किलोमीटर आहे. भारताचे क्षेत्रफळ …

पाणी प्रश्नाचे स्वरूप, गुंतागुंत आणि तिढे

(१) मनुष्य स्वभाव मोठा मजेशीर आहे. जे फुकट मिळते त्याचा तो बेजबाबदार वापर करत राहतो मग गरज असो की नसो. निसर्ग साधनसंपत्ती तर सार्वजनिक, कोणाच्याच मालकीची नाही. त्यामुळे तिचा तर वापर कसाही, केव्हाही, कुठेही करण्याचा जणू जन्मसिद्ध हक्कच. आजपर्यंत हवा, पाणी, जमीन, जंगले यांचा असाच वापर आपण करत आलो. हे करता करता अमर्याद वाटणारे पाणी …

समाजहितैषी संस्था बदललेले संदर्भ व कामाचा ढाचा

“महाराष्ट्र हे स्वयंसेवी संस्थांचे मोहोळ आहे.” असे गांधीजी म्हणत. पाचसहा दशकांपूर्वीच्या त्या स्वयंसेवी संस्था आता बढेशी कालबाह्य झाल्या आहेत किंवा अस्ताला गेल्या आहेत. स्वयंप्रेरित, समाजहितैषी कार्याचे संदर्भच पार बदलले. आपण आज एका युगाच्या अस्ताशी आणि नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. औद्योगिक समाजाचा अस्त होत आहे, आणि राष्ट्रसंकल्पनेची व्यावहारिक पातळीवर पीछेहाट होत आहे. नवीन शैक्षणिक संपर्कसाधनांद्वारे …

शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था

कृषिप्रधान संस्कृतीतूनच कामाची वाटणी (division of labour) सुरू झाली. हळूहळू वस्तुविनिमयही वाढला आणि नागरी समूह उदयाला आला. कारखानदारी आल्यावर तर नागरीकरणाने जोरच धरला आणि नागरी मानवीसमूह, ग्रामीण मानवीसमूह हे स्पष्टपणे विलग झाले. वस्तुविनिमय पैशाच्या माध्यमातूनच सुरू झाला. माणसांचे आमनेसामने संबंध व्यवहार बंद झाले. जे अनेक व्यवहार अपरोक्ष होत ते आता परोक्ष व्हायला लागले. दृश्य, सहज …

माहितीचा स्फोट, संपर्क साधनांचे जंजाळ आणि मानवी वस्त्या, समूह

१) माणसांना एकमेकांना धरून समूहाने राहायला आवडते. यात सुरक्षितता तर असतेच पण परस्परावलंबन, मानसिक धीर सापडतो. एकलेपण टाळले जाते. अगदी रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या वाड्यावस्त्या-पाडे ते आजच्या उत्तुंग इमारती असलेल्या महानगरातील माणसांचे असेच असते. शेतीचा शोध लागला आणि माणूस स्थिरावला. अतिरिक्त उत्पादनाला सुरुवात झाली. स्वास्थ्य आले आणि माणूस कायम वस्ती करून राहू लागला. ग्रामीण संस्कृती जन्माला …

पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू (भाग २)

“माती धरून ठेवा, पाणी अडवा आणि जमिनीत मुरवा” हा आजकालचा मंत्र झाला आहे पण त्याला म्हणावा तसा जोर येत नाही. पाणलोटक्षेत्र संवर्धन (Catch- ment area Management) आणि वनीकरण (Afforestation) यांनाही जोर येत नाही याला कारणे आहेत. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे एक प्रमुख कारण आहे. वनवासी गिरिजनांनी वृक्षसंपत्ती जपावी पण लाभ मात्र मैदानी लोकांचा अथवा …

पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू (भाग १)

पाऊस आकाशातून पडतो. केव्हाही, कुठेही, कितीही पडतो. लोकांना वाटते पावसाचे पाणी फुकट मिळते. पाऊस आपल्या अंगणात आणि शिवारातच फक्त पडत नाही. रानावनात, डोंगर दऱ्यात . . . सर्वत्र पडतो. हे पाणी धरून ठेवावे लागते. वाहून न्यावे लागते, आयात-निर्यात करावे लागते, स्वच्छ ठेवावे लागते, पुढील पाऊसकाळ येईपर्यंत पुरवावे लागते, म्हणून पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी लागणारे …

कुटुंबाच्या मर्यादेत वृद्धांचा सांभाळ

आठ पंधरा दिवसांपूर्वी माझ्या सासूबाई हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 83 व्या वर्षी निवर्तल्या. गेली 8-10 वर्षे त्या आमच्याचकडे होत्या. आणि त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची एकुलती एक मुलगी-माझी पत्नी–वारल्यानंतरही मी त्यांना प्रेमाने सांभाळले, हवे नको पाहिले, दवापाणी काटेकोरपण बघितले. यात जगावेगळे मी काही करीत आहे अशी माझी भावना नव्हतीच. पण त्या निवर्तल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया माझ्याजवळ व्यक्त झाल्या …

शिक्षण? कोण कोणाला हा प्रश्न विचारतोय?

१. नुकत्याच आमच्या घरकामाच्या बाई काम सोडून गेल्या. त्या नववी पास झालेल्या होत्या. त्यांच्या जागी ज्या बाई आल्या त्या अक्षरशत्रू. त्यामुळे बरीच गैरसोय झाली आहे. पूर्वी बाई कामावर आल्या तरी मी घरी असणे आवश्यक नसे. कागदावर सूचना लिहून ठेवल्या की भागत असे. माझ्याकडे कार्यालयात साफसफाई, झाडलोट करण्यासाठी एक शिपाई होता. पाच वर्षांनीपण कामाचे स्वरूप तेच …

पर्यावरण, जमिनीचे पोषकत्व आणि लोकसंख्या इ.

१. मार्च २००२ च्या आ.सु.मधील संपादकीयावर चर्चा होणे आवश्यक आहे. अशा चर्चेसाठी पूरक असे काही विचार इथे मांडत आहे. मूळ मुद्दा आहे ‘नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन’, ‘नैसर्गिक संसाधनांवर सर्वांचा हक्क’ आणि ‘नैसर्गिक संसाधनांवर येणारे लोकसंख्येचे सातत्याने दडपण’. माल्थसपासून हा विचार अधून मधून पुढे येतच राहिला आहे. पण विज्ञानामुळे उत्पादनवाढही पटीत होऊ शकते (Geometrical increase) आणि लोकसंख्यावाढ …

शेती: काही सामाजिक, काही आर्थिक, काही तांत्रिक

१. भारत आजही खेड्यांचा आणि कृषिप्रधान देश आहे. जवळ जवळ ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण आहे आणि तिचा चरितार्थ शेतीकामाशी जोडलेला आहे. अमेरिका एक तृतीयांश जगाला जेवायला घालते पण तिला आपण कृषिप्रधान म्हणत नाही कारण तिची ५-६ टक्के लोकसंख्याच शेतीकामात गुंतलेली आहे. भारतात ४० टक्के प्रजा दारिद्र्यरेषेखाली आहे. याचा अर्थ असा की एक जेवण झालेकीच तिला …

कुटुंब-व्यवस्था – मुलांना वाढविणे (भाग २)

१०. परीकथा, कहाण्या, गोष्टी मुलांचे जग स्वप्नांचे, अद्भुतरम्यतेचे असते. आजूबाजूच्या जगाविषयी कुतूहल अचंबा वाटत असतो. शिवाय स्वतःचे काल्पनिक जगही ती उभी करू शकतात. कल्पनेनेच चहा करून देतात, बाजारात जाऊन भाजी आणतात, घर घर खेळतात, फोन करतात. शहरातल्या मुलांचा परिसर म्हणजे रहदारी, गोंगाट, भडक जाहिराती असा धामधुमीचा असतो. आजकाल घरचे वातावरण पण धावपळीचे आणि यंत्राच्या तालावर …

कुटुंब-व्यवस्था — मुलांना वाढविणे (भाग १)

१.कुटुंबाच्या दोनतीन व्याख्या करणे शक्य आहे. विकेंद्रित समाजव्यवस्थेतील सर्वांत लहान स्वायत्त घटक अशी एक काहीशी राजकीय-व्यवस्थापकीय-व्यावहारिक जगातील व्याख्या होऊ शकेल. विशाल समाजपुरुषाची ती एक छोटीशी घटकपेशी आहे अशी पण व्याख्या होऊ शकते. कुटुंबाची जैविक व्याख्या पण होऊ शकते – नर मादी-पिले अशी. मानववंशसाखळी ही अखंड, अतूट असली तरी व्यक्ती, कुटुंबे ह्या त्यातल्या सुट्या सुट्या कड्या …

गृहिणी —- प्रवास चालू (दांपत्यजीवन)

“कुटुंबकेंद्रित समाज आणि स्त्रीकेंद्रितकुटुंब’ या विषयाचा मी मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय. मी काही तात्त्विक चर्चा करायला बसलेलो नाही तर या विषयात निरनिराळ्या ठिकाणाहून आत शिरण्याचा प्रयत्न करतो आहे. एक गृहिणी म्हणून तिच्या विविध प्रकारच्या कामांचा अगदी थोडक्यात मी आढावा मांडला होता. तेथे गृहिणी ही ‘कर्ती’ होती. विचार आला की या कर्तीचे पुढे होते काय? खूप …

मी “गृहिणी’ होतो

एकोणीसशे सत्याण्णवच्या मार्च महिन्यात माझी पत्नी निवर्तली. घरात मी, वय वर्षे ६४, चार हृदयविकाराचे झटके आलेल्या माझ्या सासूबाई, वय वर्षे ७७ आणि माझा नोकरी करणारा अविवाहित मुलगा, वय वर्षे २७, असे उरलो. ओघानेच घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. पत्नी जाण्याआधी तिच्या दुखण्यात पोळीभाजी करायला एक बाई ठेवल्या होत्या, ती व्यवस्था चालू ठेवली. मला स्वतःला …

अरवली गाथा

श्री. जयंत फाळके यांचे वरील मथळ्याखाली आ. सु.मध्ये दोन लेख छापल्याबद्दल अभिनंदन. बरेचसे सामाजिक बदल हे आर्थिक बदलांमुळे होत असतात. असे असूनही आ.सु.मध्ये तात्त्विक आणि तत्त्वज्ञानाच्या चर्चांना खूप जास्त प्रमाणात जागा दिली जाते असे माझे मत झाले आहे उ. ११ व्या वर्षातही ‘विवेकवाद’ कशाला म्हणायचे यावर लिखाण चालू असते. जयंत फाळके यांनी कथन केलेले तरुण …

सक्षम मेंदूला डोळस अनुभवाची गरज

आपल्या सर्वांचाच मेंदू सक्षम असतो, फक्त त्याला डोळस अनुभव द्या. (We all have same hardware but only different software.) स्थळ आहे ऐने. वांगणीस्टेशन पासून १५-२० कि. मी. अंतरावर असलेले एक आदिवासी छोटेसे गाव. ग्राममंगल संस्थेच्या चवथीपाचवीतल्या १४-१५ मुला-मुलींचा गट. नीलेश गुरुजींनी ३-४ दिवस आधी या मुलांना पोष्ट ऑफीस पाहून यायला सांगितले होते. आणि मुलेमुली काय …

जनाधिकार आणि “प्रत्यक्ष सहभागाची लोकशाही” (Empowerment & Participatory Democracy)

१. आजचा सुधारकच्या एका अंकात श्री. मोहन हिराबाई हिरालाल ह्यांचा ते करत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींच्या मेंढा-लेखा क्षेत्रातल्या प्रयोगाचे वर्णन आहे. “आमच्या गावात आम्ही सरकार, मुंबई-दिल्लीत आमचे सरकार” अशा तर्‍हेची घोषणा देऊन हे काम होत आहे त्यावेळी असा प्रश्न उपस्थित केला गेला होता की अशा तर्‍हेच्या “प्रत्यक्ष सहभागी लोकशाहीच्या’ (direct participatory democracy) लोकसंख्यीय मर्यादा काय …

“पैसा” उत्पत्ती आणि उत्क्रांती

प्रत्येक मनुष्याला आपल्या कामाचा/वस्तूचा/वेळेचा मोबदला हवा असतो. हा मोबदला सोयिस्कर स्वरूपात, दीर्घकाळ टिकेल असा, भविष्यासाठीही राखून ठेवता येईल असा आणि त्याबदल्यात काही मिळवून देईल असा असावा. पूर्वी अशा त-हेची काही सोय नव्हती. लोक रोखठोक व्यवहारात वस्तूंच्या अदलाबदली करत. परंतु हे फारच जिकिरीचे असे. अशा प्रकारची स्थानिक पातळीवरची देवाणघेवाण म्हणजे व्यापार नव्हे. तेव्हा मग व्यापा-यांनी, सावकारांनी …

एक सर्वेक्षण

औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानाची प्रगती, भांडवली अर्थव्यवस्थेचा रेटा यांमुळे उत्पादनांच्या साधनांचे ध्रुवीकरण झाले असून या आर्थिक चक्रात माणसे अधिकाधिक गुरफटत आहेत, त्यांची कुटुंबे भरडली जात आहेत असे मानून त्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांचे जीवनमान कसे आहे, जगण्याची पद्धत कशी आहे, हे शोधण्याचा प्रयत्न चिं. मो. पंडित यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी एक सर्वेक्षण करावयाचे ठरवले असून त्यासाठीची …

प्रा. लिओनार्ड आणि आजचा जर्मनी

“आपणाला आजच्या जर्मनीत काय काय कमतरता जाणवतात”? कृपया सोबतची प्रश्नावली भरून पाठवाल काय? ‘जर्मनीतल्या एका प्रख्यात नियतकालिकाने अशी प्रश्नावली काही सुप्रसिद्ध विचारवंतांना पाठविली’. प्रश्नावली अशी – तुम्हाला जर्मनीविषयी बांधिलकी का वाटते? काही खास वैयक्तिक स्नेहरज्जू? जर्मनीच्या इतिहासातील कोणत्या कालखंडात तुम्हाला राहावयाला आवडले असते ? जर्मनीच्या इतिहासातील कोणते पराक्रम, यश ही तुम्हाला सर्वोत्तम वाटतात ? कोणती …

आमच्या मुलीच्या लग्नाची गोष्ट

काही दिवसापूर्वी आमच्या मुलीचेलग्नझाले. विवाहसमारंभअगदी सुटसुटीत घरगुती पद्धतीने केला. परंतु आप्तेष्टांना मुलामुलीची माहिती, लग्नाची खबर देऊन त्यांच्या शुभेच्छांची, आशीर्वादाची आवर्जून मागणी केली. हे विवाहसूचनेचे पत्र आमच्या एका स्नेहातल्या बाईंना इतके आवडले की त्यांनी त्याचा गोषवारा एका सांजदैनिकात प्रसिद्ध केला. परिणामी पाच-सहा फोन व चार-पाच पत्रे आली, काहींनी छापील पत्राची प्रतही मागितली. माझ्या एका मित्राने ही …

माहितीचा महापूर आणि संगणकाची दादागिरी

सध्याचे युग हे माहितीचे युग आहे – This is an age of information असे म्हटले जाते. आणि माहिती म्हणजे सामर्थ्य आणि सामर्थ्य म्हणजे सत्ता असे आहे. एक प्रसंग आठवतो. दहाबारा वर्षे झाली असतील. एका अमेरिकन माणसाला मी विचारत होतो, “तुम्हाला काळजी नाही वाटत आमच्या औद्योगिकीकरणाची? एकदा आम्ही पूर्णपणे ह्यात आलो की तुमचा माल कोण घेणार?तुमची …

विरोध नेमका काय आणि कशाला आहे?

गेल्या काही दिवसांत दोन जाहीर कार्यक्रमांनी सार्वजनिक जीवनात बरीच खळबळ माजविली, मुंबईचा मायकेल जॅक्सन यांचा पॉप संगीताचा कार्यक्रम आणि बंगलोरचा विश्वसुंदरीचा स्पर्धात्मक कार्यक्रम. दोन्ही कार्यक्रमांचे आश्रयदाते १५०००-२०००० हे. रुपयांचे तिकीट सहज परवडू शकणारे होते. बिनधास्त, बेपर्वा अशा या बाजारू संस्कृतीच्या बटबटीत कार्यक्रमांना दोन्ही ठिकाणच्या राज्य सरकारांनी ठाम, निर्धारपूर्वक, करडा पाठिंबा दिला. ही दोन्ही सरकारे त्यांच्या …

पत्र

चि. मो. पडित श्री संपादक, आजचा सुधारकयांस, गेले वर्षभर माझ्या मनात जी अस्वस्थता आहे ती थोडक्यात पुढे मांडत आहे. मूल्यांचा मुद्दा उपस्थित करायचा नाही ही दक्षता यावच्छक्य घेतली आहे. “विधींचे”समर्थन/खंडन नीतिमूल्यांकडे नेत असल्यामुळे फक्त मला जशी वस्तुस्थिती आकलन होत आहे तसे वर्णन करत आहे. यात अभिनिवेश नाही, फक्त माझी बिकट अवस्था predicament आहे. आजच्या सुधारकचे …